Posts

जीवनसत्वयुक्त रानभाजी

Image
        रानभाज्या ह्या विषेश करून पावसात पाहायला मिळतात , या भाज्या आदिवासी जमातीचे लोक प्रामुख्याने रानातून गोळा करतात , ना  पेरणी, ना मशागत, ना लागवड, अश्या रानभाज्या    रानात, शेतावरील   बांधांवर सहज उपलब्ध आहेत, फक्त वेळ हवा त्याला गोळा करण्यासाठी आणि पारख हवी कोळखण्या साठी, काही भाज्या हया विषारी असू शकतात, म्हणून याची माहिती  घरातील वृध्द वेक्ती कडून  करून घेणे आवश्यक आहे, किंवा आदिवासी अश्या भाज्या बाजारात विकायला आणतात तयांच्या कडून घेतली तर अधिकच उत्तम, करण त्यांना याची  चांगलीच पारख असते.   रान भाज्यांचे अनेक प्रकार आहेत फुल भाजी, पाले भाजी, कंद प्रकार, अश्या अनेक भाज्या रानात विशेष करून पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.    या भाज्यां मध्ये भरपूर प्रमाणत लोह, शरीराच्या सर्वांगीण विकास साठी लागणारे जीवन सत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.    पावसाळा सोडून इतर ऋतू मध्ये ही या भाज्या मिळतात , त्या साठी जाणकार कडून माहिती घेतली पाहिजे. म्हणजे विषारी भाजी ओळखता आली पाहिजे.  ग्रामिण भा...

कोकणी महिला सुगरण

Image
कोकणाला मोठा समुद्र किनारा लाभला आहे तर दुसरीकडे प्राचीन मंदिर आणि निसर्गसौंदर्याने नटलेलं कोकण पर्यटकांसाठी  नेहमीच आकर्षण ठरले आहे.      काजू, करवंद, फणस, आंबे आणि रानमेवा ही फळे कोकणची एक ओळख आहे.     मासळी धरण्यासाठी कोळी बांधवच नाही तर इतर  समाजाचे लोक सुद्धा पाग, जाळी, बोक्शी इतयादी पारंपरिक साधनांचा वापर करतात.     पावसाळ्यात वलगण  लागली म्हणजे हमखास मासळी पकडण्याची संधी! गावातील बाप्या माणसं जाळी घेऊन जाणारच. रात्री दिवा, बॅटरी घेऊन  चिंबुरी, खेकडे, किरवे पकडण्याचा एक वेगळाच रोमांचक अनुभव आहे.  मासळीच कोकणी  आणि मालवणी मसाल्यांनी बनवलेलं कालवण म्हणजे एक मोठी मेजवानी.     चिकन, वडे मटन, तोंडाला आणि  नाकातून डोळयातून पाणी येईल इतकं मसालेदार आणि रुचकर पद्धतीनं बनवलेलं कांजा किंवा कालवण बोट चाटत  राहावं, असे रेसिपी बनवणाऱ्या कोकणातल्या महिला म्हणजे सुगरणी आहेत.    ग्रामीण  भागात मासळी वाटा पद्धतीन मिळण्याची प्रथा आहे, यात मिळणारी मासळी ही मिक्स प्रकार असतो, तर कधी एकाच जातीच...

कोरोना काळात या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे दुर्लक्ष झाले?

Image
 Covid19 चा काळ हा कधीही न विसारणारा  आणि नेहमी स्मरणात राहणारा असा क्षण असणार आहे. या काळात असंख्य कुटुंबे उध्वस्त  झाली, लाखो लोकांचा रोजगार या आजाराने हिसकावून घेतला आणि धंदे बंद पडले, बुडाले. अजून ही हे सत्र सुरूच आहे, अजून किती काळ राहणार हे माहीत नाही.    कुठलाही आजार असो, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी, प्रीतिबंधात्मक उपाय आणि आजाराशी दोन हात करण्याची क्षमता असायला हवी, नेमकी  याचीच उणीवा या काळात  प्रकर्षाने जाणवली.     मानसिक दृष्टीने संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम मोठ्या शर्तींन प्रसारमध्यांनी केलं,  काही अपवाद वगळता, प्रसार माध्यमांनी दिलासा देण्याचे ही कार्य केले पण आधार देण्या ऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रमाण अधिक होते.    कोरोना काळात  या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे  दुर्लक्ष झाले?    प्रत्येक माणसात रोगप्रतिकारशक्ती असायला हवी. आणि त्या साठी योग्य आणि पुरेसं अन्न, किंवा आहाराची गरज आहे.  कोरोनाच्या काळात कुपोषण आणि योग्य आहाराच्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणाम कडे नेमक...

रायगड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत झेंडू लागवड

Image
 Covid लोकडाऊन काळात अनेकांना आपला रोजगार आणि व्यवसाय गमावला, बाजारपेठ ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला.  कोकणातला शेतकरी भात शेतीवर अवलंबून असतो, तर दुसरीकडे पावसाचा अनियमितपणा शेत कऱ्यांवर टांगत्या तलवारी सारखा  आहे, अजून पावसाचं ये जा चालू आहे, त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कोकणातील असंख्य कुटुंबे मुंबई ला रोजगार निमीत्त स्थलांतरीत आहेत. पण covid मुळे अनेकांचा रोजगार धोक्यात दिसत आहे.  गावाकडील शेतकऱ्याला जर अधिक आर्थिक जोडधंदा मिळाला तर या आर्थिक मंदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार, याच  संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोहोत्सहित करण्यात समाजकार्यकर्ते सॅम्युएल नावकर याना  यश आले  आहे,आणि आज मितीला ऐकून 40 शेतकऱ्यांनी झेंडू लागवडी साठी पुढाकार घेतला आहे  गणपती दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळी लाखो रुपयांचा नफा या झेंडू शेतीतून होण्याची शक्यता संजय पवार या शेतकऱ्यांनी वेक्त केली आहे.

सौर वादळ पृथ्वीवर धडकणार? वाचा कसे

Image
 एक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर 1.6 दशलक्ष किलोमीटर वेगाने येत आहे आणि हे वादळ रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर आदळेल. स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाइटच्या मते, सूर्याच्या वातावरणापासून उद्भवलेल्या वादळाचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे वर्गाच्या क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. आकाशातील प्रकाशाचे दृश्य सौर वादळामुळे, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या लोकांना सुंदर आकाशीय रोषणाईचे दृश्य दिसेल. 1.6 दशलक्ष गती अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, सौर वादळ ताशी सुमारे 1.6 दशलक्ष किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि कदाचित याची वेग आणखी वाढेल. सौर वादळांमुळे उपग्रह सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, असे नासाने म्हटले आहे. पृथ्वीवर सौर वादळाचा परिणाम स्पेसवेदर डॉट कॉमच्या मते सौर वादळांमुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते ज्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होऊ शकतो. यामुळे जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि उपग्रह टीव्हीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. उर्जा रेषांमधील विद्युत् प्रवाह जास्त असू शकते, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो.

लॉक डाऊन

Image
COVID-19 आणि  बेरोजगारी रशिया आणि इतर देशात कोरोना मुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी आणि बेरोजगारी या विषया वर अधिक चर्चा तेथील मध्यम करताना दिसत  आहेत आणि राजकीय पक्ष तसेच विरोध पक्ष सुध्दा आर्थिक  परिस्थितीतून बाहेर  कसे पडायचे आणि  आर्थिक सुरक्षा कशी मिळेल या वर अधिक भर देताना दिसत आहेत. आप ल्या देशात मात्र परिस्थिती याच्या उलट आहे. धर्म  जात,फेकन्यूज, राजकारण, आणि जे मुद्दे महत्त्वाचे नाहीत त्या मुद्यांवर अधिक चर्चा करीत आहेत.    मित्रानो फेसबुक आणि इतर सोशल माध्यम ही विचारांची देवाणघेवाण आणि लोकशाहीच्या दृष्टीने जे पोषक आणि महत्त्वाचे आहे त्यावर अधिक चर्चा झाली पाहिजे.     रोजगार हा सर्वांत ज्वलंत विषय मात्र या लॉक   डाऊन काळात दुर्लक्षित होत आहे. अनेकांनी आपला रोजगार व्यवसाय हा या कोरोना मुळे गमावला आहे. तेव्हा प्राधान्याने रोजगार आणि व्यवसाय पुनर्जीवित कसा करता येईल या वर चर्चा झाली पाहिजे. आणि या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खाजदार यांच्या माध्यमातून या प्रश्ना कडे लक्ष वेधण्याची ही वेळ आहे. जर या कड...

लोकशाही की मोदी शही

भारताची लोकशाही ही आता कोणत्या अवस्थेत आहे हे समजून घेतले पाहिजे सध्या आर्थिक मंदी आणि रोजगाराचा मोठा प्रश्न या देशात  आ वासून उभाआहे. परंतु आमचे टीव्ही चॅनल वाले मात्र अजून हे काश्मीर आणि पाकिस्तान सारख्या प्रश्नांवर बोलत आहेत.   नुकतेच  ED  ने काही निवडक काँग्रेस राजकीय नेत्यांवर आपला शिकांजा चांगलाच कसला आहे. पण नोटा बंदी नंतर ज्या  सेक्टर चे श्रीमंतांनी भारत सोडून गेलेत आणि देशाचा सामान्य माणसाचं आयुष्य अंधारात गाडलं गेलं या सर्वांचा अर्धिक फटका सामान्य माणसाला बसला आणि मोठ्या  प्रमाणात बेरोजगारीच  संकट सामान्य कुटुंबावर कोसळले, त्याच मात्र कोणीही गंभीर विचार करत नाही. प्रधान मंत्र्यांची परदेश यात्रा,  मनकी बात, जाहिराती, कपडे इत्यादींवर करोडो रुपय खर्च झाले याच हिशोब कोणाच्या कोणाच्या खात्यातून करण्यात आला. अर्थात समण्यांच्याच.   काळा पैसा भारतात आला नाही. अलीकडेच, रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी  स्पष्ट केले की आता नाही अशा आणि नाही अपेक्षा ही आहे देशाची खरी परिस्थिती.