रायगड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत झेंडू लागवड
Covid लोकडाऊन काळात अनेकांना आपला रोजगार आणि व्यवसाय गमावला, बाजारपेठ ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला.
कोकणातला शेतकरी भात शेतीवर अवलंबून असतो, तर दुसरीकडे पावसाचा अनियमितपणा शेत
कऱ्यांवर टांगत्या तलवारी सारखा आहे, अजून पावसाचं ये जा चालू आहे, त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अश्या परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कोकणातील असंख्य कुटुंबे मुंबई ला रोजगार निमीत्त स्थलांतरीत आहेत.
पण covid मुळे अनेकांचा रोजगार धोक्यात दिसत आहे.
गावाकडील शेतकऱ्याला जर अधिक आर्थिक जोडधंदा मिळाला तर या आर्थिक मंदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार, याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोहोत्सहित करण्यात समाजकार्यकर्ते सॅम्युएल नावकर याना यश आले आहे,आणि आज मितीला ऐकून 40 शेतकऱ्यांनी झेंडू लागवडी साठी पुढाकार घेतला आहे
गणपती दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळी लाखो रुपयांचा नफा या झेंडू शेतीतून होण्याची शक्यता संजय पवार या शेतकऱ्यांनी वेक्त केली आहे.
Comments