सुजाण नागरिक एक जबाबदारी
धर्म, जात आणि वांशिक आधारावर देश चालत नाही. लोकशाही आणि संविधान , मूल्य तत्त्वंवर देश टिकू शकतो. आणि हे टिकवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. फक्त मतदान केले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी लोकाभिमुख विकास कार्यक्रम राबवतात का? का स्वःताच्या स्वार्थासाठी राज्य करतात, हे समजून त्यांना ते करण्यास भाग पाडणे ही आपली जबाबदारी आहे, कोण ऐकत नाही, हे उत्तर नकारात्मक आहे. लोकाशक्ती आणि लोकशाही मूळात ज्यांना कळली नाही ते असे बोललात. दारू आणि मटण खाऊन जर मतं विकली आणि विकत घेतली जात असेल तर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मतांसाठी पैशाची, जेवणाची, वस्तूची लाच घेतली जाते तर घेणारा आणि देणारा दोघेही लाचखोर आहेत. म्हणून भ्रष्टाचारी नेता नाही तर त्याला भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या लोकांचा पण सहभाग आणि सहकार्य मोठे आहे. देणारा आणि घेणार दोघेही भ्रष्टाचारी आहेत. निवडून आल्यावर लोक बाजूला होतात आणि पाच वर्ष बघ्याची भूमीका! हे काही निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही. देशाच्या स्वातंत्रेचा ७५ वा सुवर्णमोहत्सव ...