सुजाण नागरिक एक जबाबदारी
धर्म, जात आणि वांशिक आधारावर देश चालत नाही. लोकशाही आणि संविधान , मूल्य तत्त्वंवर देश टिकू शकतो.
आणि हे टिकवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे.
फक्त मतदान केले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी लोकाभिमुख विकास कार्यक्रम राबवतात का? का स्वःताच्या स्वार्थासाठी राज्य करतात, हे समजून त्यांना ते करण्यास भाग पाडणे ही आपली जबाबदारी आहे,
कोण ऐकत नाही, हे उत्तर नकारात्मक आहे. लोकाशक्ती आणि लोकशाही मूळात ज्यांना कळली नाही ते असे बोललात.
दारू आणि मटण खाऊन जर मतं विकली आणि विकत घेतली जात असेल तर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.
मतांसाठी पैशाची, जेवणाची, वस्तूची लाच घेतली जाते तर घेणारा आणि देणारा दोघेही लाचखोर आहेत. म्हणून भ्रष्टाचारी नेता नाही तर त्याला भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या लोकांचा पण सहभाग आणि सहकार्य मोठे आहे. देणारा आणि घेणार दोघेही भ्रष्टाचारी आहेत.
निवडून आल्यावर लोक बाजूला होतात आणि पाच वर्ष बघ्याची भूमीका! हे काही निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही.
देशाच्या स्वातंत्रेचा ७५ वा सुवर्णमोहत्सव आपण साजरा करत आहोत, अजून स्वतंत्र काय हे कळत नसेल तर स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून घेण्यास ही आपण अपात्र आहोत आणि असंख्य भारतीयांनी केलेल्या बलिदानाची किंमतही आपल्याला कळली नाही.
देश, राष्ट्र म्हणजे आपल्या अस्तित्वाची ओळख आहे, ज्या देशात, राष्ट्रात आपण राहतो त्या देशावर प्रेम करणे आणि त्याच्या सार्वभौमाचे रक्षण करणे आणि त्याचे पावित्र्य टिकवणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि धर्म आहे.
धर्म म्हणजे कर्मकांड नाही, धर्म म्हणजे कर्तव्य आणि या कर्तव्याची जाणीव मृत्यूच्या शेवटल्या क्षणा प्रयन्त असायला हवी.
मतदान देने आणि दिले म्हणजे कर्त्याव्य संपत नाही तर जबाबदारी वाढते, जेंव्हा तुम्ही देणगी किंवा दान देता तेव्हा त्याचा कुठे, कसा उपयोग होतो की नाही हे पाहणे ही आपलं कर्तव्य आहे. मतदान दिले म्हणजे आता आपली जबाबदारी संपली आणि निवडून दिलेले प्रतिनिधी तुमच्या गरजेनुसार सर्व विकासाचे कार्यक्रम अगदी प्रामाणिक पणे अमलात आणत आहेत अश्या भ्रमात राहणे हे काही कर्तव्यदक्ष आणि सुजान नागरिकांचे लक्षण नाही.
स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात, पैशे दिल्याशिवाय सरकारी कार्यालयातील फाईल हलत नाही, नौकरी मिळण्यासाठी लाच मागितली जाते, शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधानसाठी संघर्ष आणि सतत पाठपुरावा करावा लागतो. येवढ्यावरही लढा थांबत नाही.
सामान्य माणसाचे कष्ट. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, निवडून दिलेल्या आमदार खाजदार, नगरसेवक आणि पुढार्यांच्या घरी कार्यालयात निवेदन देऊन ही काम होत नाहीत आणि ही मंडळी महागड्या गाड्यातून फिरतात आणि तुम्ही आम्ही यांच्या मागे भिकार्या सारखे फिरून निवेदन आणि विनंत्या करून आपल्या स्वतःचा वेळ , पैसे खर्च करत असतो.
झेंडे घेऊन कार्यकर्ता घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत राहतो नेत्यांच्या सभेत , तिकडे घरी बायको आणि मूल उपाशी, शाळेची फी देणायस पैसे नाहीत, उसने आणि उद्धारी, शेवटी कर्ज आयुष्यभर फेडत बसतो, हे चित्र सर्वांसमोर उघडे आहे.
कधी सुधारणार आम्ही, 75 वर्ष झाले जेष्ठ नागरिक झालात अजून अक्कल नाही अली तर दुसऱ्या गुलामगिरीमधून पून्हा सुटका नाही. म्हणून वेळीच जागे व्हा वेळ अजून गेलेली नाही, स्वतंत्र भारताचे नागरिक लोकशाहीचे पाईक तुम्ही आहात आणि भारताच्या भविष्याचे शिल्पकार तुम्ही आहात, नेते नाहीत, पुढारी नाहीत, राजकीय पक्ष नाही तर तुम्ही आम्ही भारताची जनता आहे.असेल विवेक जागृत तर बोला, लिहा, लढा आणि संघर्ष करा.
"चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड करण्याची ज्यांच्यात धमक असते त्यांच्यात स्वःताच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकट पडण्याची भीती त्यांनाच असते , ज्यांना गुलाम म्हणून जगण्याची सवय असते." , 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर .
एस. पी. नावकर
Comments