Posts

Showing posts from August 8, 2021

कोकणाला भूकंपाचा धोका

Image
नैसर्गिक आपत्ती:     पूर, भूस्खलन,  सारखे नैसर्गिक आपत्तीजनक  घटना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा , सांगली येथे अलीकडच्या काळात वाढत आहेत.    कोकण किनारपट्टी, प्रामुख्याने समुद्र किनारी असल्याने येथील जमिनीचा थर पातळ असतो. कोकण पूर्णतः सहयाद्री पर्वत  रांगांनी वेढलेला असून हे सर्व डोंगर भूकंप उद्रेकामुळेच निर्माण झाले आहेत. हिमालय पर्वतच्या रांगा  सुद्धा  भूकंप वर्गीकरण नुसार अती तीव्र झोन मध्येच येतात.   पूरग्रस्त परिस्थिती ही कोकण भागासाठी नवीन नाही पण अति प्रमाणात जमीनच उत्खनन, मायनिंग सारखे प्रकल्प या मध्ये भर टाकण्याचे काम करतात आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं कार्य करत आहेत.        कोकण, लातूर, बीड, आणि  मुंबई, पालघर सारखे जिल्हे अती तीव्र भूकंप  वर्गीकरणात येतात    ज्या ठिकाणी बेसाल्ट खडक अधिक प्रमाणत आहे तेथे भूकंपाचे तीव्र झडके येण्याचे प्रमाण अधिक असते असे तज्ञांचे मत आहे.    डेक्कन ट्रॅप बेसाल्टिक रॉक, डोलेराइट डाईक रॉक, सामान्यतः गोवा समुद्रकिनाऱ्यांवर आढळतो, जो पश्चिम घाटांच्या कोंकण प्रदेश पट्ट्यात स्थित आहे.    युनेस्को जैवविविधता हॉट स्पॉटपैकी एक, सं