Posts

Showing posts from July 11, 2021

कोरोना काळात या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे दुर्लक्ष झाले?

Image
 Covid19 चा काळ हा कधीही न विसारणारा  आणि नेहमी स्मरणात राहणारा असा क्षण असणार आहे. या काळात असंख्य कुटुंबे उध्वस्त  झाली, लाखो लोकांचा रोजगार या आजाराने हिसकावून घेतला आणि धंदे बंद पडले, बुडाले. अजून ही हे सत्र सुरूच आहे, अजून किती काळ राहणार हे माहीत नाही.    कुठलाही आजार असो, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी, प्रीतिबंधात्मक उपाय आणि आजाराशी दोन हात करण्याची क्षमता असायला हवी, नेमकी  याचीच उणीवा या काळात  प्रकर्षाने जाणवली.     मानसिक दृष्टीने संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम मोठ्या शर्तींन प्रसारमध्यांनी केलं,  काही अपवाद वगळता, प्रसार माध्यमांनी दिलासा देण्याचे ही कार्य केले पण आधार देण्या ऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रमाण अधिक होते.    कोरोना काळात  या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे  दुर्लक्ष झाले?    प्रत्येक माणसात रोगप्रतिकारशक्ती असायला हवी. आणि त्या साठी योग्य आणि पुरेसं अन्न, किंवा आहाराची गरज आहे.  कोरोनाच्या काळात कुपोषण आणि योग्य आहाराच्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणाम कडे नेमक...

रायगड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत झेंडू लागवड

Image
 Covid लोकडाऊन काळात अनेकांना आपला रोजगार आणि व्यवसाय गमावला, बाजारपेठ ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला.  कोकणातला शेतकरी भात शेतीवर अवलंबून असतो, तर दुसरीकडे पावसाचा अनियमितपणा शेत कऱ्यांवर टांगत्या तलवारी सारखा  आहे, अजून पावसाचं ये जा चालू आहे, त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कोकणातील असंख्य कुटुंबे मुंबई ला रोजगार निमीत्त स्थलांतरीत आहेत. पण covid मुळे अनेकांचा रोजगार धोक्यात दिसत आहे.  गावाकडील शेतकऱ्याला जर अधिक आर्थिक जोडधंदा मिळाला तर या आर्थिक मंदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार, याच  संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोहोत्सहित करण्यात समाजकार्यकर्ते सॅम्युएल नावकर याना  यश आले  आहे,आणि आज मितीला ऐकून 40 शेतकऱ्यांनी झेंडू लागवडी साठी पुढाकार घेतला आहे  गणपती दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळी लाखो रुपयांचा नफा या झेंडू शेतीतून होण्याची शक्यता संजय पवार या शेतकऱ्यांनी वेक्त केली आहे.

सौर वादळ पृथ्वीवर धडकणार? वाचा कसे

Image
 एक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर 1.6 दशलक्ष किलोमीटर वेगाने येत आहे आणि हे वादळ रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर आदळेल. स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाइटच्या मते, सूर्याच्या वातावरणापासून उद्भवलेल्या वादळाचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे वर्गाच्या क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. आकाशातील प्रकाशाचे दृश्य सौर वादळामुळे, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या लोकांना सुंदर आकाशीय रोषणाईचे दृश्य दिसेल. 1.6 दशलक्ष गती अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, सौर वादळ ताशी सुमारे 1.6 दशलक्ष किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि कदाचित याची वेग आणखी वाढेल. सौर वादळांमुळे उपग्रह सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, असे नासाने म्हटले आहे. पृथ्वीवर सौर वादळाचा परिणाम स्पेसवेदर डॉट कॉमच्या मते सौर वादळांमुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते ज्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होऊ शकतो. यामुळे जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि उपग्रह टीव्हीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. उर्जा रेषांमधील विद्युत् प्रवाह जास्त असू शकते, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो.