कोरोना काळात या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे दुर्लक्ष झाले?


 Covid19 चा काळ हा कधीही न विसारणारा  आणि नेहमी स्मरणात राहणारा असा क्षण असणार आहे. या काळात असंख्य कुटुंबे उध्वस्त  झाली, लाखो लोकांचा रोजगार या आजाराने हिसकावून घेतला आणि धंदे बंद पडले, बुडाले. अजून ही हे सत्र सुरूच आहे, अजून किती काळ राहणार हे माहीत नाही.

   कुठलाही आजार असो, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी, प्रीतिबंधात्मक उपाय आणि आजाराशी दोन हात करण्याची क्षमता असायला हवी, नेमकी  याचीच उणीवा या काळात  प्रकर्षाने जाणवली.

    मानसिक दृष्टीने संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम मोठ्या शर्तींन प्रसारमध्यांनी केलं,  काही अपवाद वगळता, प्रसार माध्यमांनी दिलासा देण्याचे ही कार्य केले पण आधार देण्या ऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रमाण अधिक होते.

   कोरोना काळात  या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे  दुर्लक्ष झाले? 

  प्रत्येक माणसात रोगप्रतिकारशक्ती असायला हवी. आणि त्या साठी योग्य आणि पुरेसं अन्न, किंवा आहाराची गरज आहे.  कोरोनाच्या काळात कुपोषण आणि योग्य आहाराच्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणाम कडे नेमकं दुर्लक्ष झाल.

    सर्व लक्ष हे कोरोना कडे आणि  उपलब्ध निधी सुद्धा याच आजारासाठी वापरण्यात आला  आणि अजून ही हेच घडतं आहे. कोरोनाच्या भीतीने आपल्या शारीरिक आणि मानसिक सुस्तपणाचा मोठ्याप्रमाणात फायदा घेतला. 

     कोविड मुळे   समाजाच्या  आत्म-सन्मान आणि मानसिक सामर्थ्याला बराच मोठा मानसिक धक्का बसला.

       या दरम्यान मानसिक आधार, समोपदेश सारखे कार्यक्रमांचा समावेश केला नाही आणि फक्त, पोलीस, जमावबंदी, लोकडाऊन सारखे उपचारात्मक उपाय अमलात आणले, त्याचा परिणाम मानसिक खच्चीकरण एवढेच. प्रतिबंधात्मक  उपाय दुर्लक्षित राहिले. 

    या आरोग्याच्या कोरोना आणीबाणीच्या  काळात अत्यंत महत्वाच्या विषयाचे नियोजन आणि   व्यवस्थापण करण्यात सरकार आणि प्रशासकीय  यंत्रणा अपयशी ठरले आहेत.

    

Comments

Popular posts from this blog

Narayan Seshadri: A Pioneer of Christian Mission

Marathi Portuguese: The Unique Language of Korlai Village

Unveiling the Dark Side: Prostitution in Nashik's Trimbak Road Lodgings