कोकणी महिला सुगरण
काजू, करवंद, फणस, आंबे आणि रानमेवा ही फळे कोकणची एक ओळख आहे.
मासळी धरण्यासाठी कोळी बांधवच नाही तर इतर समाजाचे लोक सुद्धा पाग, जाळी, बोक्शी इतयादी पारंपरिक साधनांचा वापर करतात.
पावसाळ्यात वलगण लागली म्हणजे हमखास मासळी पकडण्याची संधी! गावातील बाप्या माणसं जाळी घेऊन जाणारच. रात्री दिवा, बॅटरी घेऊन चिंबुरी, खेकडे, किरवे पकडण्याचा एक वेगळाच रोमांचक अनुभव आहे.
मासळीच कोकणी आणि मालवणी मसाल्यांनी बनवलेलं कालवण म्हणजे एक मोठी मेजवानी.
चिकन, वडे मटन, तोंडाला आणि नाकातून डोळयातून पाणी येईल इतकं मसालेदार आणि रुचकर पद्धतीनं बनवलेलं कांजा किंवा कालवण बोट चाटत राहावं, असे रेसिपी बनवणाऱ्या कोकणातल्या महिला म्हणजे सुगरणी आहेत.
ग्रामीण भागात मासळी वाटा पद्धतीन मिळण्याची प्रथा आहे, यात मिळणारी मासळी ही मिक्स प्रकार असतो, तर कधी एकाच जातीचा म्हावरा( मासळी) स्थानिक बोली भाषेतला शब्द.
आज हे चित्र कमी जरी दिसत असले , तरी कोकणची आण बाण आणि शान ही नेहमीच कायम राहणार आहे.
या विषयावर जेवढ लिहू तेवढं थोडच आहे, एकदा कोकणाला आवश्यक भेट द्या तुमचे स्वागत आहे.
।अतिथी देवोभव:।
Comments