जीवनसत्वयुक्त रानभाजी

    

   रानभाज्या ह्या विषेश करून पावसात पाहायला मिळतात , या भाज्या आदिवासी जमातीचे लोक प्रामुख्याने रानातून गोळा करतात , ना  पेरणी, ना मशागत, ना लागवड, अश्या रानभाज्या    रानात, शेतावरील   बांधांवर सहज उपलब्ध आहेत, फक्त वेळ हवा त्याला गोळा करण्यासाठी आणि पारख हवी कोळखण्या साठी, काही भाज्या हया विषारी असू शकतात, म्हणून याची माहिती  घरातील वृध्द वेक्ती कडून  करून घेणे आवश्यक आहे, किंवा आदिवासी अश्या भाज्या बाजारात विकायला आणतात तयांच्या कडून घेतली तर अधिकच उत्तम, करण त्यांना याची  चांगलीच पारख असते.

  रान भाज्यांचे अनेक प्रकार आहेत फुल भाजी, पाले भाजी, कंद प्रकार, अश्या अनेक भाज्या रानात विशेष करून पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

   या भाज्यां मध्ये भरपूर प्रमाणत लोह, शरीराच्या सर्वांगीण विकास साठी लागणारे जीवन सत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. 

  पावसाळा सोडून इतर ऋतू मध्ये ही या भाज्या मिळतात , त्या साठी जाणकार कडून माहिती घेतली पाहिजे. म्हणजे विषारी भाजी ओळखता आली पाहिजे. 

ग्रामिण भागातील लोकांनां या भाज्यांची चांगली माहिती आहे. 

   पावसाळ्यात अश्या रानभाज्या खाल्यास चांगले जीवनसत्व शरीराला मिळतात, आणि या भाज्या विनामुल्य उपलब्ध असून आदिवासी समाजाच्या महिला बाजारात सुद्धा विकायला आणतात. त्यांच्या कडून विकत घेतले तर त्यांना ही चार पैसे मिळतील आणि आपल्याला पण या भाज्या स्वस्त दारात मिळतील.

 तर या वर्षी रानभाज्या विकत घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवा.

Comments

Popular posts from this blog

Celebrating 25 Years of Empowerment: Jankalyan Trust's Journey

Narayan Seshadri: A Pioneer of Christian Mission

A Collaborative Approach to Traffic Safety in Kalamboli