लॉक डाऊन


COVID-19 आणि  बेरोजगारी
रशिया आणि इतर देशात कोरोना मुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी आणि बेरोजगारी या विषया वर अधिक चर्चा तेथील मध्यम करताना दिसत  आहेत आणि राजकीय पक्ष तसेच विरोध पक्ष सुध्दा आर्थिक  परिस्थितीतून बाहेर  कसे पडायचे आणि  आर्थिक सुरक्षा कशी मिळेल या वर अधिक भर देताना दिसत आहेत. आपल्या देशात मात्र परिस्थिती याच्या उलट आहे. धर्म जात,फेकन्यूज, राजकारण, आणि जे मुद्दे महत्त्वाचे नाहीत त्या मुद्यांवर अधिक चर्चा करीत आहेत. 

  मित्रानो फेसबुक आणि इतर सोशल माध्यम ही विचारांची देवाणघेवाण आणि लोकशाहीच्या दृष्टीने जे पोषक आणि महत्त्वाचे आहे त्यावर अधिक चर्चा झाली पाहिजे.

    रोजगार हा सर्वांत ज्वलंत विषय मात्र या लॉक   डाऊन काळात दुर्लक्षित होत आहे. अनेकांनी आपला रोजगार व्यवसाय हा या कोरोना मुळे गमावला आहे. तेव्हा प्राधान्याने रोजगार आणि व्यवसाय पुनर्जीवित कसा करता येईल या वर चर्चा झाली पाहिजे. आणि या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खाजदार यांच्या माध्यमातून या प्रश्ना कडे लक्ष वेधण्याची ही वेळ आहे. जर या कडे असेच दुर्लक्ष केले तर कोरोणा   नंतर या कडे नकोण लक्ष देईल याची शाश्वती नाही.

रात्र वैऱ्याची आहे आणि जनतेचा वाली कोंही नाही. रेशन आणि भाषण नको तर रोजगार निर्माण झाला पाहिजे.
सॅम्युएल नावकर

Comments

Popular posts from this blog

Celebrating 25 Years of Empowerment: Jankalyan Trust's Journey

Illiteracy, Ignorance, and Illnesses: The Plight of Katkari Villages in Raigad

Delays in Road Construction Pose Threat to Villagers at Ladavali bridge:Raigad Fort Road