कोरोना काळात या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे दुर्लक्ष झाले?
Covid19 चा काळ हा कधीही न विसारणारा आणि नेहमी स्मरणात राहणारा असा क्षण असणार आहे. या काळात असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली, लाखो लोकांचा रोजगार या आजाराने हिसकावून घेतला आणि धंदे बंद पडले, बुडाले. अजून ही हे सत्र सुरूच आहे, अजून किती काळ राहणार हे माहीत नाही. कुठलाही आजार असो, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी, प्रीतिबंधात्मक उपाय आणि आजाराशी दोन हात करण्याची क्षमता असायला हवी, नेमकी याचीच उणीवा या काळात प्रकर्षाने जाणवली. मानसिक दृष्टीने संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम मोठ्या शर्तींन प्रसारमध्यांनी केलं, काही अपवाद वगळता, प्रसार माध्यमांनी दिलासा देण्याचे ही कार्य केले पण आधार देण्या ऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रमाण अधिक होते. कोरोना काळात या महत्वाच्या आरोग्याच्या विषया कडे दुर्लक्ष झाले? प्रत्येक माणसात रोगप्रतिकारशक्ती असायला हवी. आणि त्या साठी योग्य आणि पुरेसं अन्न, किंवा आहाराची गरज आहे. कोरोनाच्या काळात कुपोषण आणि योग्य आहाराच्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणाम कडे नेमक...