विवाह बाह्य संबंधा मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा ऐक पाऊल पुढें
विवाह बाह्य संबंधा मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा ऐक पाऊल पुढें
" 7 out of 10" प्रमाण
अश्लीलता, सेक्स स्कॅनडल हे शब्द समाजात निषेध
( taboo) म्हणून ओळखले जातात.
व्यभिचार हा शब्द मुळात सर्रास दैनंदिन जीवनात वापरला जाणार शब्द असून, स्त्री पुरुष दोघेही व्यभिचार करतात पण या विषयी फारशी चर्चा होत नाही, स्त्री पुरुष दिघेही व्यभिचारी आहेत, या संदर्भात अनेक वृत्त प्रसिद्ध झाले आहेत, ज्या मध्ये स्त्री ही पती नसताना प्रियकरा सोबत रंगे हात पकडण्याचे आणि पळून जाण्याचे तर दुसरीकडे पुरुष परस्त्री सोबत अनैतिक संबंध ठेवण्याचे किस्से आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
सध्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा बहू चर्चित किस्सा म्हणजे पॉर्न फिल्म आणि त्यावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या.
सेक्स हा विषय मुळात नवीन नाही जेव्हा प्रत्येक्ष कृती स्वरूपात समाजमध्ये अश्या घटना घडतात तेव्हा त्यांच्या चर्चेला उधाण येते, मात्र समाजात विवाह बाह्य संबंध आणि विवाह अंतर्गत संबंध असे अनेक घटना आणि किस्से दररोज कुठे ना कुठे घडत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आणि कोणी पॉर्न विडिओ पहिला आणि निर्माण केला तर त्या विषयी वादळ निर्माण होते
77% भारतीय महिला विवाह बाह्य संबंध करतात असे एका अहवालात प्रसिद्ध झाले आहे, 53 टक्के स्त्रियांनी कबुल केले आहे की त्या विवाह बाह्यसंबंध करतात, असे livemint.com च्या वृत्त अहवालात स्पष्ट केले आहे. लिंक शेवटी देत आहे.
त्याच्या तुलनेत पुरुषांची टक्केवारी 43 एवढी आहे म्हणजे स्त्रिया ह्या अनैतिक संबंधकारण्यात पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
प्राचीन भारतात असे अनेक किस्से आहेत, उदाहरण दाखल देने झाल्यास अजंठा-वेरुळ आणि प्राचीन मंदिरान मध्ये सुद्धा असे अनेक चित्र रेखाटले आहेत ज्या मध्ये सेक्स या विषयावर प्रचंड लिखाण आणि शीला लेख आज देखील अस्तित्वात आहेत, हे सर्व संस्कृती आणि कला म्हणून ओळखले जातात.
मात्र पॉर्न व्यवसाय आणि वेश्या व्यवसायला दोष देऊन समाजातील व्यभिचार, बलात्कार, विवाह बाह्य आणि विवाह अंतर्गत सांबांध कडे दुर्लक्ष होते. हे सर्व पॉर्न विडिओ पाहणे आणि निर्माण करण्या पेक्षा अधिक घातक आणि सामाजिक व्यवस्थेला मारक आहेत.
पॉर्न विडिओ पाहून सेक्स स्कॅनडल वाढत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. आजची राहणीमान, पेहराव.. बिकनी, व्हॅलेंटाईनडे, हाफ पॅन्ट,जीन्स पॅन्ट, नो ब्रा ,पाश्च्यात संस्कृतीचे अनुकरण, असे अनेक घटक कारणीभूत आहेत.
मोठ्या शहरा मध्ये आणि आता ग्रामीण भागात सुद्धा बॉय फ्रेंड, गर्ल फ्रेंड , व्हाट्सअप्प चॅट, फेसबुक, इन्स्टाग्राम सारखे अनेक मध्यम ही या साठी कारणीभूत आहेत, म्हणून एकट्या पॉर्न फिल्म ला दोष देने शहाणपणाचं लक्षण नाही.
प्रथम संस्कृती जपणे, जतन करणे, जोपासणे आणि ती आचरणात आणून टिकवणे हे महत्वाचे आहे.
( कोणाला या विषयावर अधिक माहिती हवी असेलतर लिंक पाठवतो किंवा तुम्ही स्वःता google करू शकता https://www.livemint.com/industry/media/55-married-indians-have-cheated-on-their-spouses-most-are-women-survey-11582712240534.html)
Comments